एक आस ..

आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी
अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते
अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का
कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे
भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे
साडी मस्त शोभतीये आज–मनमोकळी दाद दे
सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने
मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे
वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे
वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे
पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे
झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे
हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे
अशी काहीशी साथ दे
मित्रत्वाचा हात दे

– अनामिका

images (1)

 

 

 

 

(नोंद : ही कविता मी लिहिलेली नाही..मल आवडली म्हणून मी इथे पोस्ट केली. )

For more post click on : https://sonamaddy.wordpress.com/

also you can find me at : http://wp.me/p4ufUo-r Continue reading

Advertisements
Posted in Uncategorized | Leave a comment

मेहेंदी..मनाला खुलवणारी..

मेहेंदी हा माझा सर्वात जास्त आवडीचा विषय आहे.फक्त नाव ऐकल तरी लगेच चेहऱ्यावर काही तरी आवडीचे बोलले जाणार असे भाव येतात आणि मन मेहेंदीच्या रंगासोबत रेखलेल्या डीझाईन मधून वाट शोधु लागत.तिच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या रंगासोबत दरवळणारा वास तर सदैव सोबत रहावासा वाटतो.त्यासोबतच ती हातावर काढण्याची मजा तर   काही औरच…आजकाल अनेक प्रकारच्या डीझाईन काढण्याची पद्धत असली तरी मला भावते ती पारंपारिक गोलाकार नक्षी.टिंब,रेषा अगदी आपल्याला पाहिजे तशा रुपात रेखाटून हळू हळू त्यांना आपला मनमोहक रंग देऊन रंगवते ती मेहेंदी ….माझ्या आवडीची..

Design-1                           ..आणि हि मेहेंदी फक्त हातांचाच रंग खुलवते असा नाही..पायांवर पण हि तितक्याच अधिकाराने आपले वर्चस्व सांगते. जोपर्यंत तिच्यामध्ये खुलण्याची क्षमता आहे तोपर्यंत..मग ती कधी लग्नासारख्या समारंभात सर्वांसोबत आणि सर्वांसमोर आपला रंग उधळते किंवा कधी पायातील पैंजण बनून मूकपणे खूप काही बोलून जाते.कधी तर लाडाची कलवरी बनून हि थेट नवरीच्या पायावर जाऊन बसते..अशीच एका नाजूक पायाला आपल्या रंगाने वेढा घालणारी मेहेंदी..

Awesome-Foot-mehendi-design

Posted in Uncategorized | Leave a comment

सोनचाफा ..मला आवडलेला

This gallery contains 1 photo.

सोनचाफा .. फक्त शब्द ऐकला तरी मन सुगंधाने भरून जात .. तशी मला सगळीच फूलं आवडतात पण सोनचाफ्ह्याशी खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत असा वाटत..मला आजपर्यंत न यानंतरही सर्वात जास्त गिफ्ट मिळालेला आणि मिळणार आहे असा सोनचाफा….

Gallery | Leave a comment